विधाता - एक स्वरांची सफर...

विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

थोडक्यात सांगायचं तर रत्नागिरी सारख्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची आणि सगळ्या कलाकारांची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी या साठी आमच्या मनात अशी एक कल्पना आली की, आपल्या कोकणामध्ये खूप अतिशय गुणवान व कलेमध्ये अग्रेसर असे कलाकार आहेत. तांत्रिक ज्ञान किंवा असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी एक स्वत्रंत व्यासपीठ लागते पण ते तेवढ्या प्रमाणात मिळत नाही. परंतु मुंबई - पुणे मेट्रो सिटी इथे कलाकारांना सहज संधी मिळण्याची शक्यता असते. आपल्या कलाकारांना संधी मिळण्यासाठी आम्ही हे व्यासपीठ म्हणजेच वेबसाईट रुपी दालन सर्वांसाठी उघडत आहोत.