विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

अभिजीत भट

गायक

बायोडाटा

आपल्या कोकणामधील रत्नागिरी शहरातील अत्यंत हुरहुन्नरी असलेला आघाडीचा नवोदित गायक म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. तो म्हणजे अभिजीत भट . दूरदर्शनवरील खूप गाजलेल्या प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन संगीत स्पर्धेचा रत्नागिरी भागाचा प्रथम विजेता म्हणून पुरस्कार त्याने प्राप्त केला आहे.त्याने आत्तापर्यंत अनेक हिंदी /मराठी ऑर्केस्ट्रामध्ये सेलेब्रेटींबरोबर गायन केले आहे.संगीत क्षेत्रामध्ये खल्वायन या संस्थेचा तो सभासद आहे.कट्यार काळजात घुसली,सौभद्र अशा निरनिराळ्या संगीत नाटकांमध्ये त्याने प्रमुख भुमिका केली आहे. विधाता म्युझिकचा पावला गणराजा हा अल्बम करताना अत्यंत भरीव कामगिरी अभिजीतने केली आहे.त्याचे विधाता म्युझिक सदैव ॠणी आहे.