एक गीत ,एक ध्वनिफीत रसिकांसमोर येते. त्याला लोकप्रियता मिळते . त्या गीताचा ,ध्वनिफितीचा चेहरा बनतो तो "गायक " ! आपली आजपर्यंतची तपश्चर्या गायक त्या गीतात ओतत असतो . त्यामुळे गीताच्या त्या चेहऱ्याला रसिकांची पसंती मिळायलाच हवी. पण तेच गीत परिपूर्ण करण्यासाठी इतर अनेक हात झटत असतात . हे हात एकमेकांमध्ये घट्ट ओवलेले असतात .म्हणून हे गीत ,गीत न राहता आनंद बनून जातं .