संगीत विश्वरूप मानलं तर या विश्वातले कलाकार ताऱ्यांसमान असतात. लुकलुकणारे, तेजाने तळपणारे पण स्वयंप्रकाशितही! पण या विश्वाची मात्र एक गंमत असते, कोणताही तारा दुसऱ्याशिवाय अपूर्ण असतो. त्यामुळे पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग सहकार्यानेच पूर्ण होतो. विचाराची हीच धारा मनात ठेवून आम्ही एक प्रयोग आपल्या समोर ठेवत आहोत. ही संकल्पना कोणताही आर्थिक हेतू , वैयक्तिक फायदा नजरेसमोर न ठेवता, केवळ चळवळ म्हणून व्यापक स्वरूपात रसिकांसमोर आणू इच्छितोs.
एक गीत, एक ध्वनिफीत रसिकांसमोर येते. त्याला लोकप्रियता मिळते. त्या गीताचा, ध्वनिफितीचा चेहरा बनतो तो "गायक "! आपली आजपर्यंतची तपश्चर्या गायक त्या गीतात ओतत असतो. त्यामुळे गीताच्या त्या चेहऱ्याला रसिकांची पसंती मिळायलाच हवी. पण तेच गीत परिपूर्ण करण्यासाठी इतर अनेक हात झटत असतात. हे हात एकमेकांमध्ये घट्ट ओवलेले असतात. म्हणून हे गीत, गीत न राहता आनंद बनून जातं.
आणि म्हणूनच आनंदाची अनुभूती निर्माण करणाऱ्या या संपूर्ण शृंखलेला रसिकांसमोर आणणे हे लक्ष्य नजरेसमोर ठेवून "विधाता म्युझिक" सादर करत आहे २१ गीतांची धवनिफीत 'पावला गणराजा'.
कोकण आणि गणेशोत्सव याचं नातं अतूट आहे. कोकणातले जे जे तारे आज कलाक्षेत्रात अढळपद मिळवून आहेत त्यांच्या प्रवासाची सुरुवात या गणेशोत्सवापासूनच झाली आहे 'पावला गणराज' या द्वानीफितीमधल्या सगळ्या कलाकारांची नाळ कोकणाशी जोडली आहे.
ही ध्वनिफीत साकारण्यासाठी १६ यशस्वी संगीत संयोजक, १२ उभरते तसेच प्रथितयश गीतकार, १४ तरुण, नामवंत गायक, ८ लोकप्रिय गायिका, १३ यशस्वी तसेच उभरते संगीतकार, १९ सुप्रसिद्ध वादक, २१ कोरस गायक, २ वेबसाइट डिझाइनर, २ छायाचित्रकार, एक सी डी डिझाइनर, मुंबई, पुणे, कोकणासह आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे काम करणाऱ्या १० स्टुडिओमधील कल्पक रेकॉर्डिस्ट अशा १०० जणांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. आमच्या हेतूला मान देऊन अनेक कलाकारांनी अत्यल्प मानधनामध्ये या ध्वनिफितीमध्ये सहभाग नोंदवला आहे.
यापूर्वी विधाता म्युझिकच्या माध्यमातून दोन ध्वनिफितींचं प्रकाशन आम्ही केलं आहे. त्यातील एक सुप्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे याच्या आवाजात साकारली आहे. 'पावला गणराजा' या ध्वनिफितीचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारच्या प्रायोजकत्वासाठी प्रयत्न न करता विधाता म्युझिकने सगळा आर्थिक भार उचलला आहे. विधाता म्युझिकने या सर्व कलाकारांसाठी तसेच नवीन उभरत्या कलाकारांना संधी मिळावी व त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून www.vidhatamusicrtn.com या संकेत स्थळाचे उद्टघान झाले आहे. यामध्ये प्रत्येक कलाकाराची संक्षिप्त ओळख आम्ही दिली आहे. जेणेकरून प्रत्येक गाण्याच्या पाठी जे लोक कष्ट घेतात त्यांची ओळख लोकांना होऊ शकेल. जेणेकरून त्याने केलेल्या नवीन संगीत निर्मितीची ओळख लोकांना होईल. कोणताही कलाकार या वेबसाईटवर स्वतःबद्दलची माहिती, त्याचा व्हिडीओ, ऑडिओ किंवा लेखी माहिती विनामूल्य देऊ शकतो तसेच या अल्बममध्ये असणारी २१ गाणी विनामूल्य स्वरूपात आम्ही लोकांना उपलब्ध करून देणार आहोत.
विशेष आभार
:: स्टुडिओ ::
-
⏺ ऑडिओ आर्टस् ,ठाणे
-
⏺ आजिवासन स्टुडिओ ,जुहू
-
⏺ एस .कुमार स्टुडिओ ,रत्नागिरी
-
⏺साऊंडसिन्थ स्टुडिओ ,विरार
-
⏺ बझ इन स्टुडिओ ,विलेपार्ले
-
⏺ डॉट व्हेव स्टुडिओ ,पुणे
-
⏺ नील माधव स्टुडिओ ,मुंबई
-
⏺ व्हर्ब् ग्रो स्टुडिओ ,अंधेरी
-
⏺ डॉन स्टुडिओ ,पुणे
:: वाहतूक व्यवस्था ::
-
⏺ अजय रेडीज
-
⏺ योगेश म्हस्के
-
⏺ विजय कदम
-
⏺ प्रशांत पाटणकर
:: विशेष सहाय्य ::
-
⏺ उदयराज सावंत
-
⏺ आदित्य ओक
-
⏺ अभिजीत भट
-
⏺ मानस देसाई
-
⏺ राजा केळकर
-
⏺ प्रमोद कोनकर
-
⏺ धनंजय मुळ्ये
:: विशेष आभार ::
-
⏺ अनंत आगाशे
-
⏺ अनुजा आगाशे
-
⏺ दीप्ती आगाशे
-
⏺ दुर्वा आगाशे
-
⏺ आगाशे फूड्सची सर्व टीम
-
⏺ नितीन कानविंदे
-
⏺ पुर्वा पेठे
-
⏺ दीप्ती कानविंदे
-
⏺ मामा पाटणकर
-
⏺ ॐ साई मित्र मंडळ
-
⏺ समिर तिवरेकर
-
⏺ अभिजीत गोडबोले
-
⏺ पराग सावंत
-
⏺ संजीव अभ्यंकर
-
⏺ सर्व पत्रकार
-
⏺ इलेक्ट्रॉनिक मिडिया
-
⏺ सर्व वृत्तपत्र