विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

विजय शिवलकर

वादक

बायोडाटा

आपल्या कोकणातील रत्नागिरी शहरातून मांडवी येथून असणारा व सध्या भारतात व भारताबाहेर अनेक मोठ्या गायकांबरोबरोबर एक चांगला ऱ्हिदम अॅरेंजर म्हणून व वादक म्हणून ज्याचे नाव घेतले जाते तो म्हणजे विजय शिवलकर .प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्याबरोबर अनेक वर्ष तो तालसाथ करत आहे. २०११ साली अखिल भारतीय नाट्यपरिषद अॅवॉर्ड मिळाले आहे .त्याने २०१४ साली आर .डी . बर्मन अॅवॉर्ड मिळाला आहे. प्रसिद्ध संगीतकार आर .डी . बर्मन यांचे ताल संयोजक मारुतीराव किर हे त्यांचे गुरू आहेत.आजवर अनेक बॉलीवूड व मराठी चित्रपटांमध्ये ,ध्वनिफितींमध्ये त्यांनी ऱ्हिदम अॅरेंजिंग व ऱ्हिदम प्लेईगचे काम केले आहे.