विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

विजय रानडे

संगीतकार

बायोडाटा

रत्नागिरीच्या संगीत क्षेत्रामधील ज्यांची संगीतातील परंपरा पिढीजात आहे असे ते म्हणजे विजय रानडे. त्यांनी संगीताचे शिक्षण वयाच्या पाचव्या वर्षांपासून वडील कै. विनायकबुवा रानडे यांच्याकडे झाले .हे एक उत्कृष्ट संगीतकार आहेत.हार्मोनियमचे शिक्षण ते तुळशीदास बोरकर यांच्याकडे घेत आहे.घन अमृताचा,शांतीब्रह्म ,हे सुरांनो घ्या भरारी असा संगीत नाटकांना संगीत दिग्दर्शन केले आहे.घन अमृताचा या नाटकासाठी संगीत दिग्दर्शनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. २००१ व २००२ साली अखिल भारतीय नाट्य परिषदेचा स्वरराज्य ,छोटा गंधर्व गुणगौरव पुरस्कार त्यांना मिळाला आहे.शांतीब्रह्म या नाटकासाठी संगीत दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक व ऑर्गन साथीचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे . आज ते जी. जी.पी.एस. या प्रशालेमध्ये संगीत शिक्षक म्हणून काम करतात. बालगंधर्व रसिक मंडळ पुणे यांचा सन २०१६ सालचा भास्करबुवा बखले पुरस्कार त्यांना मिळाला आहे.