विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

वैभव फणसळकर

संगीत संयोजक

बायोडाटा

आपल्या रत्नागिरीतील किबोर्ड या वाद्यामध्ये पारंगत असलेला अनेक मोठ्या कलाकारांना साथसंगत करणारा माणूस म्हणून ज्याची ओळख आहे .तो म्हणजे वैभव फणसळकर संगीत संयोजन ,संगीत संयोजक उत्तम किबोर्ड वादक ही त्याची वैशिष्ट्ये आहेत . तसेच तो उत्तम हार्मोनियम प्लेअर आहे. डॉ विद्याधर ओक यांच्याकडे तो शिकत आहे .तसाच तो रत्नागिरीतील ऑर्केस्ट्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या हार्मनी ग्रुपचा सदस्य आहे. किबोर्ड हे वाद्य जरी इलेक्ट्रॉनिक असले तरी त्यामधून म्युझिक पिस वाजवताना ज्याप्रमाणे ओरिजिनल गाण्यामध्ये जे वाद्य जसे वाजले आहे त्या फिलने वाजवण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे. वैभवने यापूर्वी विधाता म्युझिकच्या उकडीचे मोदक व ओंकार तू .. या अल्बममध्ये संगीत संयोजक व संगीत संयोजन केले आहे.