विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

उमेश रावराणे

संगीत संयोजक

बायोडाटा

आपल्या कोकणातील कणकवली शहरातील व सध्या मुंबईत स्थित असलेला एक नामवंत संगीत संयोजक म्हणजे उमेश रावराणे . ज्याची सुरुवात प्रसिध्द ऑर्केस्ट्रा "सेव्हन कलर्स " यामधील किबोर्ड आर्टिस्ट म्हणून झाली . सलग सहा वर्षे त्याने किबोर्ड आर्टिस्ट म्हणून काम केले आहे . त्याने आतापर्यंत अनेक गाजलेल्या जिंगल्स ,अॅडव्हर्टाइज उदा . मॅगडोनाल्डर्स ,हिरो होंडा इ . त्याने आतापर्यंत आदेश श्रीवास्तव ,नदीम श्रवण ,अवधूत गुप्ते ,सुरेश वाडकर त्यांच्यासोबत संगीत संयोजन केले आहे . मराठीतील पोरबाजार , एक हजाराची नोट ,गजर ,गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा ,गोष्ट छोटी डोंगराएवढी या चित्रपटांना संगीत दिले आहे . तसाच नुकताच गाजलेला ट्रॅफिक हा चित्रपट संगीतबद्ध केला आहे . अमिताभ बच्चन यांच्या बाभूळ चित्रपटासाठी बॅकग्राऊंड व प्रोग्रामिंग केला आहे . तसेच त्याने संगीत संयोजन केलेल्या संहिता या चित्रपटाला नॅशनल अॅवॉर्ड मिळाले आहे .