विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

उदयराज सावंत

रेकॉर्डिस्ट

बायोडाटा

आपल्या कोकणातील एकमेव डिजिटल रेकॉर्डिंग स्टुडिओ व डिजिटल JBL फ्लायिंग साउंड सिस्टिम असलेला म्हणून जो लोकप्रिय आहे असा आमचा मित्र ,विधाता म्युझिकचा सदस्य उदयराज सावंत. तो स्वतः एक उत्तम साउंड इंजिनिअर आहे . त्याच्या एस. कुमार साउंड स्टुडिओमध्ये पं. तुळशीदास बोरकर यांच्यासारखे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असणारे व सव्वादिनी वादक , रसिक गानू,शमिका भिडे ,प्रथमेश लघाटे अशा अनेक मोट्या कलाकारांचे डबिंग ,मिक्सिंग व रेकॉर्डिंग ,मास्टरींग झाले आहे . स्थानिक लोकांची अनेक भजने तसेच लालबागचा राजा ,अखंड आरती ,ओंकार तू.. इ. अनेक ध्वनीफीतींचे रेकॉर्डिंग याच्या स्टुडिओमध्ये झाले आहे .विधाता म्युझिकच्या या अल्बमसाठी स्वतःच्या स्टुडिओचा पूर्ण वेळ देऊन तसेच कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता त्याचे सर्वतोपरी सहकार्य आम्हाला लाभले आहे . निव्वळ कोकणातील कलाकार पुढे यावा . त्याला एखादी चांगली संधी प्राप्त व्हावी असा त्याचा कायम उद्देश असतो . कोकणातील पहिला डिजिटल स्टुडिओ करण्याचा मान त्याच्याकडे जातो . तो उत्तम लाईव्ह साउंड इंजिनिअर आहे . प्रसिद्ध असलेले साउंड इंजिनिअर व संगीतकार आदित्य ओक यांच्याकडे रेकॉर्डिंग व क्षेत्रातील पूर्ण मार्गदर्शन केले आहे . आदित्य ओक अवधूत गुप्ते,स्वप्नील बांदोडकर ,वैशाली सामंत, गझलकार वैभव जोशी ,जयतीर्थ मेवुंडी,सत्यजित प्रभू इ. अनेक कलाकार कोकणात एखादा कार्यक्रम करायचा असेल तर ते आग्रहाने उदयराज सावंत यांचेच नाव घेतात. तो गेली १० वर्षे स्टुडिओ या विषयात आहे व गेली २१ वर्षे साउंड सिस्टिम या विषयात आहे. मुंबईतील आघाडीचे ध्वनीसंयोजक जयवंत राणे ,संजय राणे हे त्यांच्या गुरुस्थानी आहेत . विधाता म्युझिक त्यांचे सदैव ऋणी आहे.