विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

उदय साळवी

मिक्सिंग अँड मास्टरींग

बायोडाटा

आपल्या कोकणातील खेड या तालुक्यातून असलेला व सध्या मुंबईमध्ये असलेला एक उत्तम संगीत संयोजक म्हणून काम करत आहे तो म्हणजे उदय साळवी.हँगऑन ओ रसिया या गाण्यासाठी त्याला बेस्ट संगीत दिग्दर्शक म्हणून नामांकन मिळाले आहे.त्याने अडगुळ मडगुळ,हरी ॐ विट्ठ्ला,पॉकेट मनी या चित्रपटांना बॅकग्राऊंड स्कोर केला.अमिताभ बच्चन यांच्या बाबुल या हिंदी चित्रपटामध्ये बॅकग्राउंड स्कोर इंजिनीअर म्हणून काम केले आहे.तुका आकाशाएवढा या अल्बमला उत्तम ध्वनीफित म्हणून पुरस्कार मिळाला आहे.NIFF गोल्डन कॅमेरा ॲवॉर्ड त्यांना मिळाला आहे.पावला गणराजा या अल्बम मधील 14 गाण्यांचे मिक्सिंग व मास्टरींग उदय साळवी यांनी केले आहे.ते सध्या अंधेरी येथे त्यांच्या स्वतःच्या स्टुडिओमध्ये प्रोग्रॅमिंगचे काम करीत आहेत.