विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

उदय पाटणकर

ग्राफिक डिझायनर

बायोडाटा

आपल्या कोकणातील रत्नागिरी शहरातील एक प्रथितयश युवा डिझायनर म्हणून ज्याचे नाव घेतले जाते ते म्हणजे उदय पाटणकर . गेली २० वर्ष तो या क्षेत्रामध्ये काम करत आहे . सतत काहीतरी डिझायनिंग मध्ये नवीन करण्याची त्याची धडपड चालू असते. कोणत्याही प्रकारचे डिझायनिंग मधले शिक्षण न घेता आज ज्या लोकांनी डिझायनिंग क्षेत्रात खूप मोठ्या पदव्या घेतल्या आहेत त्यांना हि प्रश्न पडेल असे डिझायनिंग उदय करतो . आज त्याचे श्री साई प्रिंटर्स अँड ट्रेडर्स या नावाचे स्वतःचे ऑफिस आहे . त्याच्याकडे डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग ,इको सॉल्व्हन्ट प्रिंटिंग, विनाईल प्रिंटिंग,टी-शर्ट प्रिंटिंग,व्हिजिटिंग कार्ड ,स्क्रीन प्रिंटिंग इ. प्रकारचे काम होते . विधाता म्युझिकच्या सर्वात पहिल्या उकडीचे मोदक या अल्बम चे व आता होऊ घातलेल्या पावला गणराजा ... या अल्बम चे पूर्ण डिझाईनिंग त्याचे आहे . कोणत्याही क्षेत्रामध्ये फक्त शिक्षण घेतल्याने पारंगत होता येते असे नाही तर व्यक्तीकडे ते आत्मसात करण्याची कसोटी व जिद्द असेल तर तो कोणत्याही स्तरावर काम करू शकतो हे उदयकडून दिसते . त्याला त्याचे वडील श्री. मुकुंद (मामा) पाटणकर यांच्याकडून या क्षेत्रातील मार्गदर्शन मिळाले आहे . भाऊ प्रशांत पाटणकर व त्याची आई सौ. स्वाती पाटणकर यांचे सर्वोतोपरी मदत मिळत आहे .