वादक,संगीतकार,संगीत संयोजक
आपल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रायपटण येथून असलेला व सध्या मुंबई व पुणे या ठिकाणी एक उत्तम हार्मोनियम वादक तसेच संगीतकार व संगीत संयोजक म्हणून स्वतःचे नाव उमटवत असलेला तो म्हणजे तेजस पळसुलेदेसाई . तो उत्तम कवी आहे . त्याचे गुरु डॉ. विद्याधर ओक हे आहेत . डिजिटल ॲकॅडमी मधून त्याने साऊंड इंजिनिअरिंग केले आहे . तो सध्या सी. ए. करत आहे .तसेच तो पुणे येथील भारती विद्यापीठातून एम.ए. इन म्युझिक करीत आहे .