विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

सौरभ काजरेकर

रेकॉर्डिस्ट

बायोडाटा

आपल्या कोकणामधून असलेला आणि सध्या अंधेरी येथे वास्तव्यास असणारा तो म्हणजे सौरभ काजरेकर . त्यांचा स्वतःचा बझ इन नावाचा स्टुडिओ विलेपार्ले येथे आहे . त्याने आत्तापर्यंत व्हिनस कंपनी एच. एम. व्ही. सा रे ग म,टाइम्स म्युझिक , युनिव्हर्सल ,टी सिरीज यांच्याबरोबर काम केले आहे. अनेक चित्रपट व सीरिअल्स यांचे बॅकग्राऊंड म्युझिक केले आहे . तो एक उत्कृष्ट साउंड इंजिनिअर आहे . त्याने आत्तापर्यंत यंदा कर्तव्य आहे , इरादा पक्का , महाराष्ट्र ढाबा भटिंडा या चित्रपटांचे रेकॉर्डिंग केले आहे. तसेच झी मराठीच्या कळत नकळत , कुलवधू ,उंच माझा झोका , राधा हि बावरी या सीरिअल्सचे टायटल रेकॉर्डिंग व मिक्सिंग केले आहे. त्याने मातीच्या चुली ,भावाची लक्ष्मी यासाठी बॅकग्राऊंड स्कोर केला आहे. सॉंग रेकॉर्डिंग व मिक्सिंग यासाठी नामांकन असणाऱ्या दिवस ओल्या या मराठी फिल्मला नामांकन मिळाले आहे.