बायोडाटा
कोकणातील कुडाळ या गावातून आलेला आणि सध्या भारतात व भारताबाहेर ज्याची ख्यातनाम किबोर्डिस्ट म्हणून ओळख आहे तो म्हणजे सत्यजित प्रभु . वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून तो हार्मोनिअम वाजवत आहे . त्यांनी सुरुवातीला श्री अनिल केरकर आणि मकरंद कुंडाळे यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली . त्यानंतर १९९२ साली अशोक हांडे प्रस्तुत चौरंग या कार्यक्रमांमध्ये कीबोर्ड प्लेअर म्हणून सुरुवात केली . अशोक हांडे यांचे ५००० च्या वर लाईव्ह शोज भारतात व भारताबाहेर केले आहेत . सुरेश वाडकर , सोनू निगम ,अशोक पत्की , अजय -अतुल अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत कीबोर्ड साथ केली आहे . अनेक मराठी अल्बम ,हिंदी अल्बम यामध्ये त्यांनी किबोर्ड साथ केली आहे . हार्मोनिअम व किबोर्ड यांचा एकत्रित सोलो इन्स्टुमेंटलचा कार्यक्रम आदित्य ओक आणि सत्यजित प्रभु करीत आहेत ज्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे . झी मराठीच्या गाजलेल्या सा रे ग म प या रिअॅलिटी शोची सगळी पर्व यांनी वाजविली आहेत . या कार्यक्रमामध्ये सत्यजितमुळे कधीच कोणत्याही गाण्याचे रिटेक आजपर्यंत झालेले नाहीत . तो सध्या रोलँड या जगातील नामवंत कंपनीबरोबर साउंड क्रीएशन साठी काम करीत आहे . कोणत्याही प्रकारच्या वाद्याचा बाज जसाच्या तसा कीबोर्डवर प्ले करणे यामध्ये त्याचा हातखंडा आहे . विधाता म्युझिक त्याने केलेल्या अपूर्व सहकार्याबद्दल सदैव ऋणी आहे .