विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

सचिन भावे

वादक

बायोडाटा

आपल्या कोकणातील रत्नागिरी शहरामधून असलेले व तबला क्षेत्रामध्ये ज्यांचे नाव विशेष घेतले जाते ते म्हणजे श्री.सचिन भावे. अनेक मोठ्या गायकांबरोबर सचिन भावे यांनी तबला साथ केली आहे . ते एक उत्तम कोंगो व तुंबा प्लेअर आहेत . अनेक हिंदी / मराठी मैफिलीचे कार्यक्रम ,आर्केस्ट्रा जे म्हणजे सुरांचे चांदणे , म्युझिकल स्टार्स यामधून त्यांनी वादन केले आहे वादनामधील परफेक्शन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे . तसेच ते एक उत्तम संगीत संयोजक आहेत . विनायक बुवा रानडे ,हिरेमठ सर ,मनमोहन कुंभारे हे त्यांचे गुरु आहेत . ते गेले २५ वर्षे या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत . त्यांनी अवधूत गुप्ते ,विनोद राठोड ,वैशाली सामंत इ . मोठ्या गायकांना साथसंगत केली आहे .संगीत नाट्य राज्य स्पर्धेमध्ये दिल्ली येथे संगीत संयोजनाची पारितोषिक मिळाले आहे. तसेच संगीत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये मृगतृष्णा संगीत ययाती देवयानी , संगीत स्वयंवर , संगीत सुवर्णतुला या नाटकांसाठी पार्श्वसंगीत दिले आहे .