विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

रसिका गानु

गायिका

बायोडाटा

आपल्या कोकणातील देवरुख गावामधून असलेली आघाडीची गायिका जी आता मुंबई व पुण्यामध्ये आपल्या संगीताचा वारसा वाढवत आहे . ती म्हणजे रसिका गानू. तिने एम. ए. विथ म्युझिक पूर्ण केले आहे. गाण्याचे प्रशिक्षण लहानपणापासून आई-वडील व काही वर्ष सौ. माधुरी डोंगरे यांच्याकडे सुरु होते.दादर माटुंगा आंतर महाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धा २००९ मध्ये पारितोषिक मिळाले आहे. ई टीव्ही गौरव महाराष्ट्राचा या रिअॅलिटी शो मध्ये टॉप आठ पर्यंत तिचा सहभाग होता . सुरेश वाडकर यांनी अजिवासन संस्थेची स्कॉलरशिप जाहीर केली.आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात समूह गायन व सुगम संगीत यामध्ये तिला गोल्ड मेडल मिळाले आहे.झी मराठी सा रे ग म प सुर नव्या युगाचा या रिऍलिटी शो मध्ये टॉप ६ पर्यंत सहभाग होता.पोस्टर गर्ल या मराठी चित्रपटांमध्ये रखुमाई या गाण्यामध्ये पार्श्वसंगीत गायले आहे .