विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

प्रथमेश लघाटे

गायक

बायोडाटा

आपल्याच कोकणातील आरवली गावचा महाराष्ट्राचा लाडका गायक म्हणजेच प्रथमेश लघाटे . ज्याच्या विषयी जेवढं आपण बोलू तेवढं कमीच आहे . त्याने विधाता म्युझिकच्या उकडीचे मोदक व ओंकार तू .. या अल्बम साठी गाणे गायले आहे . तो सध्या भारती विद्यापीठातून एम. ए. संगीत करत आहे. आरवली गावामध्ये त्याच्या घरामध्ये अनेक वर्षे दर गुरुवारी भजन केले जाते . यातूनच त्याला संगीताची आस लागली . सुरुवातीला सतीश कुंटे हे त्याचे गुरु होते . झी सा रे ग म प लिटिल चॅम्प या पर्वाचा तो खूप गाजलेला गायक आहे . त्याने आत्तापर्यंत अनेक मोठ्या गायकांसोबत गायन केले आहे .