विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

मधुसूदन लेले

वादक

बायोडाटा

आपल्या कोकणातील रत्नागिरी शहरातून असणारे एक नामवंत ऑर्गन व हार्मोनियम वादक म्हणजेच श्री. मधुसूदन लेले. पं. तुळशीदास बोरकर यांच्याकडे गेली ११ वर्षे ते मार्गदर्शन घेत आहे . २००९ सालच्या संगीत नाट्य स्पर्धेमध्ये त्यांना उत्कृष्ट ऑर्गन वादक म्हणून पारितोषिक मिळाले आहे . तसेच २०१३ साली संगीत मार्गदर्शक म्हणून त्यांना प्रथम पुरस्कार मिळाला आहे . ८० हून जास्त संगीत नाटकांच्या प्रयोगांना त्यांनी ऑर्गन साथ केली आहे . २५० हून जास्त मैफिलींना हार्मोनियम व ऑर्गन साथ केली आहे . आशाताई खाडिलकर , आनंद भाटे , विकास कशाळकर , संजीव मेहेंदळे ,चारुदत्त आफळे ,मुग्धा भट -सामंत , बकुळ पंडित , प्रथमेश लघाटे इ . मोठ्या गायकांना साथसंगत केली आहे .