विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

केतकी शेट्ये – ब्रम्हनाळकर

गायिका

बायोडाटा

आपल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर या गावातून सध्या मुंबईमध्ये गायन क्षेत्रामध्ये एक चांगले नाव कमावलेली गायिका म्हणजे केतकी . ती संगीत विशारद आहे . तसंच तिने मुंबई विद्यापीठातून एम . ए. गोल्ड मेडल इन म्युझिक असं मिळवलं आहे . सध्या ती इंडियन क्लासिकल म्युझिकमध्ये पी.एच.डी. करीत आहे. ती वयाच्या ९व्या वर्षांपासून श्री बाळकृष्ण केळकर आणि शामला कुलकर्णी यांच्याकडे शिक्षण घेत होती . त्यानंतर रत्नागिरीतील मुग्धा भट -सामंत यांच्याकडे तिने संगीत मार्गदर्शन चालू केले . व सध्या ती पं. अरुण कशाळकर यांसकडे प्रशिक्षण घेत आहे . तिला नॅशनल यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप मिनिस्ट्री ऑफ इंडिया मिळाली आहे . तिने ई टीव्हीवरील गौरव महाराष्ट्राचा सिझन -१ साठी सादरीकरण केले आहे . लाईट व सेमिक्लासिकल युथ फेस्टिवलचे मुंबई युनिव्हर्सिटी चे सिल्वर मेडल मिळाले आहे . तसेच २००९ सालच्या राज्य नाट्यस्पर्धेचे गायनाचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे आणि पं. भीमसेन जोशी स्कॉलरशिप २०१२ साली मिळाली आहे . तिने या आधी मोदक उकडीचे व चैत्र पालवी या अल्बमसाठी गायन केले आहे .