विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

कमलेश भडकमकर

संगीत संयोजक,संगीतकार

बायोडाटा

आपल्या कोकणातील भडकंबा गावामधून असलेला व सध्या मुंबईतील संगीत क्षेत्रामध्ये ज्याचा दबदबा आहे तो म्हणजे कमलेश भडकमकर .कमलेश एक उत्तम संगीत दिग्दर्शक तसेच संगीत संयोजक ,संगीत दिग्दर्शन ,संगीतकार म्हणून काम करतो. पं.श्री. श्रीनिवास खळे यांच्याकडे तो अनेक वर्षे संगीत मार्गदर्शनासाठी होता . भारतातील पहिले ३ दिवस असलेले "संगीतकार संमेलन " कमलेशने भरविले होते . याला लोकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता सा रे ग म प सारख्या झी मराठीच्या गाजलेल्या संगीत शो चे सर्व पर्व कमलेश भडकमकर यांनी केली आहेत . दूरदर्शनच्या प्रचंड गाजलेल्या "ताक धीना धीन "या शो चा किबोर्डिस्ट म्हणून कमलेशने काम केले आहे . अनेक मोठ्या मराठी व हिंदी सेलिब्रेटींबरोबर काम केले आहे.