बायोडाटा
आपल्या कोकणातील देवगड तालुक्यातील गीतकार म्हणून प्रसिद्ध असलेले नाव म्हणजे चंद्रशेखर तेली . ते गेली २० वर्षे देवगड येथील सहकारी बँकेत वरिष्ठ पदावर आहेत . दिवाळी अंकातून त्यांच्या अनेक कविता प्रकाशित झाल्या आहेत . 9X झकास मराठी चॅनलवर बळीराजा हे शेतकऱ्यांसाठी लिहिलेले गीत टेलिकास्ट झाले आहे. मालवणी भाषेतही त्यांनी लेखन केले आहे. साईधाम मुक्ती मंदिर ट्रस्टचा समाजरत्न पुरस्कार २०१६ ने सन्मानित आहेत . स्वच्छ भारत अभियान या गीताच्या लेखनामध्ये त्यांचा सहभाग आहे . त्यांचे हे गाणे राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांकाचे ठरले आहे .