विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

अमित पाध्ये

संगीतकार,संगीत संयोजक

बायोडाटा

आपल्या कोकणातील देवगड गावचा व सध्या मुंबईमध्ये राहत असलेला एक चांगला हार्मोनिअम प्लेअर ,ऑर्गन प्लेअर तसंच उत्तम संगीत संयोजक अशी ज्याची ओळख आहे तो म्हणजे अमित पाध्ये. पं .तुळशीदास बोरकर हे त्याचे गुरु आहेत . प्रसिद्ध संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांच्याबरोबर संगीत सहाय्यक म्हणून अनेक वर्ष काम केले आहे . १०० प्रयोग पूर्ण केलेल्या नांदी नाटकामध्ये पूर्ण हार्मोनिअम वादन केलेले आहे . शंकर महादेवन , रजनी जोशी ,रामदास कामत ,मंजुषा पाटील ,भरत बळवल्ली सारख्या मोठ्या कलाकारांना हार्मोनिअम साथ केलेली आहे . व्हॉट अबाऊट सावरकर यासारख्या चित्रपटांना म्युझिक अरेंजिंग व कंपोझिंग व बॅकग्राऊंड दिले . व्हॉट अबाऊट सावरकर बॅकग्राऊंडला विशेष लक्षवेधी संगीताचा पुरस्कार मिळाला आहे . उंच माझा झोका या सिरिअलला बॅकग्राऊंड म्युझिक दिले आहे . एकाच प्याला , वस्त्रहरणचे सेलिब्रिटी ३० प्रयोग वाजवले आहेत.