विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

आदित्य ओक

वादक,संगीत संयोजक,रेकॉर्डिस्ट

बायोडाटा

आपल्या कोकणामधील चिपळूण तालुक्यातील बामणोली या गावातून असलेला व सध्या मुंबईमध्ये चौथ्या पिढीतील एक आघाडीचा हार्मोनियम वादक ,उत्कृष्ट साऊंड इंजिनिअर तसेच संगीत दिग्दर्शक म्हणून ज्याची ओळख आहे ,असा आदित्य ओक. वयाच्या आठव्या वर्षापासून डॉ .विद्याधर ओक यांच्याकडे हार्मोनिअमचे प्रशिक्षण घेत आहे . तसेच प्रसिद्ध हार्मोनिअम व ऑर्गन वादक श्री गोविंदराव पटवर्धन यांच्याकडून त्याला सहा वर्ष मार्गदर्शन केलेले आहे . सतराव्या वर्षी त्यांनी USA कॉन्सर्टमध्ये सादरीकरण केले होते . त्यांनी आतापर्यंत आशा भोसले ,पंडित जसराज ,सुरेश वाडकर ,कविता कृष्णमूर्ती ,जयतीर्थ मेवुंडी ,राहुल देशपांडे , आनंद भाटे यांना साथ संगत केली आहे . ५० हून जास्त चित्रपटांमध्ये हार्मोनिअम वादन केले आहे .खूप गाजलेल्या "कट्यार काळजात घुसली " या चित्रपटातील सर्व गाण्यांचे संगीत संयोजन आदित्यने केले आहे . तसेच "बालगंधर्व " या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केले आहे . तसेच पहिल्यांदा सोलो हार्मोनिअमचा कार्यक्रम सत्यजित प्रभू व आदित्य ओक यांनी "जादुची पेटी " या कार्यक्रमातून केला आहे .