विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

आदित्य कुडाळकर

संगीत संयोजक

बायोडाटा

आपल्या कोकणातल्या कुडाळ गावामधून मुंबईमध्ये ज्याचे नांव संगीत संयोजक म्हणून आग्रहाने घेतले जाते . तो म्हणजे आदित्य कुडाळकर अनेक नामवंत मराठी चित्रपटांना त्याने संगीत संयोजन केले आहे .प्रसिद्ध संगीत संयोजक समीर म्हात्रे यांच्याकडे दादर या ठिकाणी तो सध्या काम करीत आहे . तो २००८ पासून या क्षेत्रामध्ये आहे . नटसम्राट ,काकस्पर्श ,लोकमान्य या चित्रपटांना बॅकग्राऊंड म्युझिक त्याने केले आहे . रेगे चित्रपटातील सर्व गाणी आदित्य याने केली आहे . सध्या गाजत असलेली खुलता कळी खुलेना या सिरिअलचे टायटल सॉंग आदित्यने केले आहे . त्याचे गुरु कमलाकांत गवस , मॅन्युअल नोरोंन्हा ,सायरस पंथकी हे आहेत . खूप युवा संगीत संयोजक म्हणून त्याची ओळख आहे .