बायोडाटा
रत्नागिरी शहरातील एक उभारता गायक,संगीतकार व गीतकार म्हणून ज्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते तो म्हणजे अभिजित नांदगावकर .तो आकाशवाणीचा 'बी ' ग्रेड मान्यताप्राप्त गायक आहे. त्याने गायनाचे शिक्षण विजय रानडे,मुग्धा सामंत,पं. प्रदीप नाटेकर ,मुंबई यांचेकडे घेतले आहे .पुण्यातील श्रीरंग कलानिकेतन सुगम गायन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे . अनेक ध्वनीफितींसाठी त्याने गायन केले आहे . आकाशवाणी ,एबीपी माझा,झी २४ तास,टीव्ही९ आदि वृत्तवाहिन्यांवरुन कविता ,गीते सादर केली आहेत.गेली १५ वर्षे पत्रकार म्हणून काम करत आहे.सध्या दै .तरुण भारत या वृत्तपत्रामध्ये ते कार्यरत आहेत.