विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

संदीप पाटील

संगीतकार,संगीत संयोजक,गीतकार

बायोडाटा

मुंबई पुणे येथील अतिशय नावाजलेल्या संगीतकारांपैकी ज्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते ते म्हणजे संदीप पाटील .संगीताचे प्रथमिक शिक्षण श्री.सुमंत तुकाराम शिंदे यांच्याकडे झाले. ६ वर्ष गुरुकुल पद्धतीने गुरुगृही राहून विनोदकुमार मिश्रा यांच्याकडे बनारस घराण्याच्या शास्त्रीय गायनाचे शिक्षण झाले. प्रसिद्ध संगीत संयोजक अनिल मोहिले यांच्याकडे काही वर्ष सहाय्यक म्हणून काम केले. मराठीहिन्दी/उर्दू/अशा भाषांमधून गीतलेखन केले आहे.प्यार वाली लव्ह स्टोरी ,ब्लॅकबोर्ड, या चित्रपटांसाठी गीत लेखन केले आहे.मुंबई विद्यापीठामध्ये सांस्कृतिक समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.झी नाट्य गौरव या सोहळ्यामध्ये प्रायोगिक नाटक विभागात भेटी लागी जिवा या नाटकाच्या उत्कृष्ट पार्श्वगायनासाठी नामांकन मिळाले होते.त्यांनी आजवर अनेक चित्रपटांना,अल्बमना संगीत दिले आहे. त्यांनी दिग्दर्शन केलेल्या अनेक इव्हेंट्सना नॅशनल लेव्हल पर्यंतचे पारितोषिक मिळाले आहे. अतिशय प्रेमळ स्वभावाचे तसेच संगीतामधील कोणत्याही कामाला झोकून देणारे अशी त्यांची ओळख आहे.मराठी संगीत जगवण्यासाठी ते खूप मेहनत घेत असतात . ते गीतकार आहेत.पावला गणराजा या अल्बम मधील सात गाणी त्यांनी संगीतबद्ध केली आहेत.संदीप पाटील यांचे विधाता ग्रुप सदैव ऋणी आहे.