विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

रविराज कोलथरकर

संगीत संयोजक

बायोडाटा

आपल्या कोकणातील चिपळूण शहरातील एक चांगला संगीत दिग्दर्शक , संगीत संयोजक की ,ज्याला लहानपणापासून संगीताची आवड होती तो म्हणजे रविराज कोलथरकर . किबोर्ड वाजविण्यासाठीचे पाहिलं मेडल त्याला तिसरीत असतानाच मिळालं आहे .त्याचे वडील कै. विजय शंकर कोलथरकर यांच्याकडून त्याला संगीताचा वारसा व शिक्षण मिळाले आहे . किबोर्डिस्ट म्हणून भारतात व भारताबाहेर ५००० पेक्षा जास्त शोज केले आहेत . इस्राईल मध्ये त्यांच्याच शोमध्ये त्यांच्या भाषेतील प्रार्थना संगीतबद्ध केली आणि सादर केली आहे. मुंबई विद्यापिठातील (Music Composition & Direction)चे शिक्षण सुप्रसिद्ध संगीतकार श्री. अनिल मोहिले यांच्यामार्गदर्शनाखाली पूर्ण केले आहे . सध्या तो संगीतकार व संगीत संयोजक म्हणून काम करीत आहे . भारतातील सर्व विद्यापीठांसाठी दरवर्षी युवा महोत्सवाचं आयोजन होतं त्यामध्ये भारतीय समूहगीत या प्रकारा करिता मुंबई विद्यापिठ व एसएनडीटी महिला विद्यापीठांना सलग आठ वर्ष संगीत दिग्दर्शन ,आठ वर्ष राज्य ,आठ वर्ष विभागीय व सहा वर्ष राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे.