विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

राजा केळकर

वादक

बायोडाटा

कोकणातील आपल्या रत्नागिरीमधील असलेल्या व सध्या ख्यातनाम पखवाज वादक असलेले एकमेव नाव म्हणजे राजा केळकर .त्यांचे सुरुवातीचे शिक्षण विनायकबुवा रानडे यांच्याकडे झाले . त्यानंतर माऊली सावंत व पर्शुराम गुरव यांच्याकडे सध्या ते पखवाजचे धडे घेत आहेत . वयाच्या ५ वर्षांपासून ते कीर्तन व भजन यामध्ये साथ करत आहेत. मराठी वाद्यवृंद सुरांचे चांदणे यांची त्यांनी निर्मिती केली आहे . दूरदर्शन वरील सुरसंगम या कार्यक्रमात २५ स्थानिक कलाकारांना घेऊन त्यांनी उत्तम सादरीकरण केले आहे. मंगलमूर्ती येई घरा .. कोकणातील पारंपरिक आरती ,अखंड आरती या ध्वनीफितींच्या निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग आहे . त्यांनी आजपर्यंत अनेक कनसेप्ट शो केले आहेत . २००९/१० सालाची ४९ व्या संगीत राज्य नाट्य साथसंगतीचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे . प्रभाकर कारेकर ,सुरेश वाडकर , अजित कडकडे ,शौनक अभिषेकी , आनंद भाटे , मुग्धा वैशंपायन ,प्रथमेश लघाटे , कार्तिकी गायकवाड , श्रीधर फडके , अवधूत गुप्ते ,जयतीर्थ मेवुंडी , उपेंद्र भट यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत पखवाजाची साथसंगत केली आहे . कुठल्याही कलाकाराला तो लहान असो वा मोठा राजा केळकर हे व्यक्तीमत्व त्याच्या कोणत्याही अडचणीला त्याक्षणी मदत करणे हा त्याचा अत्यंत चांगला आदर्श सर्वानी घेण्यासारखा आहे.