विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

अशोक बागवे

गीतकार

बायोडाटा

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गीतकार म्हणून ज्यांचे नांव घेतले जाते ते म्हणजे प्रा. अशोक बागवे.त्यांच्या अनवट वाटेने जाणाऱ्या कविता कौशल इनामदाराने संगीत देऊन लोकप्रिय केल्या आहेत. 'माझ्या मराठी मातीचा बोल' या मराठी अभिमान गीताचे गीतकार म्हणून त्यांनी काम केले आहे.शांताबाई शेळके यांसारख्या लोकप्रिय कवयित्रींचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे .अनेक चित्रपट गीते व शीर्षक गीते त्यांनी आतापर्यंत लिहिली आहेत. तसेच स्वतःचे ९ गाण्याचे अल्बम त्यांनी प्राकाशित केले आहेत.महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कवितासंग्रहाचा कवी केशवसुत पुरस्कार,झी गौरव सर्वोत्कृष्ट गीतकार २००७ चा पुरस्कार,शासनाचा सर्वोत्कृष्ट कवितासंग्रहाचा बालकवी पुरस्कार त्यांना मिळाला आहे.प्रिय सालस ही कांदबरी तसेच पाच नाटके,दहा एकांकिका ,पसायदान कालचे व आजचे याची ४०० व्याख्याने त्यांनी दिली आहेत.